गडचिरोली : सर्व जाती समुहासह ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, यासाठी भारत मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग (obc) व सहयोगी आरपीआयच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी चौकात धरणे प्रदर्शन करण्यात आले. बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात हे धरणे देण्यात आले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
या मागण्यांसोबत एसटी- एससी- ओबिसी यांच्या समर्थनातील युजीसी बिल लागू करण्यात यावे, तसेच 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टिईटी मधुन मुक्त करावे यासाठी बामसेफ आरपीआयचे हे धरणे आंदोलन होते.
याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर म्हणाले, वामन मेश्राम हे खऱ्या अर्थाने ओबिसी-एसटीच्या हक्कासाठी झटणारे एकमेव नेते आहेत. याप्रसंगी गुरुदेव भोपये, हरिदास कोटरंगे यांचीही समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राऊत यांनी केले.
या आंदोलनाला डोमाजी गेडाम, लवकुंश भैसारे, सिद्धार्थ भानारकर, रोशन उके, हेमंत बारसागडे, मोरेश्वर निमगडे, त्रिभुवन बाळबुद्धे, संघमित्रा राजवाडे, लता भैसारे, लता रामटेके, जीवन मेश्राम, दामोधर शेंडे, चरण बारसागडे, प्रेमदास रामटेके, रमेश डोंगरे, नरेंद्र शेंडे, चोखोबा ढवळे, खुशाल चौधरी, देवाजी भैसारे, सुरेश मेश्राम, मुरलीधर मेश्राम, माया मेश्राम, अमिता भैसारे, सत्यभामा कोटांगले, सुमन उंदिरवाडे, सुप्रिया मेश्राम, श्याम दोनाडकर, योगेश मडावी, अरुण भैसारे, नाजुक भैसारे, रमेश गजभिये, जयराम उंदिरवाडे, शेवंता जांभुळकर, लिला वाकडे, वाजुदा शेख, माया मेश्राम, ज्योती मेश्राम, रजनी खैरे, देवला शेंडे, रघुनाथ बाबनवाडे, केशव गणवीर, राजू दुर्याधन यांच्यासह बामसेफ-आरपीआयचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
































