भाजप औद्योगिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अग्रवाल

आघाड्यांच्या प्रमुखांची नियुक्ती

गडचिरोली : भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी जिल्ह्यासाठी विविध आघाड्यांच्या प्रमुखांची (प्रकोष्ठ) नियुक्ती केली आहे. त्यात औद्योगिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी युवा उद्योजक आकाश अग्रवाल यांनी पुनर्नियुक्ती करण्यात आली.

इतर आघाड्यांमध्ये बुद्धीजीवी प्रकोष्ठ म्हणून सतीश चिचघरे, विधी प्रकोष्ठ अॅड.संजय देशमुख, व्यवसाय प्रकोष्ठ अनिल करपे, डॅाक्टर प्रकोष्ठ डॅा.प्रिया खोब्रागडे, सहकार प्रकोष्ठ शशिकांत साळवे, सांस्कृतिक प्रकोष्ठ संदीप राऊत, व्यापार प्रकोष्ठ राजेश जेठाणी, आर्थिक प्रकोष्ठ अॅड.मंगेश भरडकर, मच्छीमार प्रकोष्ठ मोहन मदने, कामगार आघाडी सुधाकर पेटकर, भटके विमुक्त आघाडी सुरेश मांडवगडे, दिव्यांग सेल दत्तू माकोडे, अध्यात्मिक सेल धनराज नागपुरे, सोशल मीडिया सेल आनंद खजांची, आयटी सेल ओमकार मडावी आणि शिक्षक आघाडीवर स्वरूप तारगे यांची नियुक्ती करण्यात आली.