गडचिरोली : नवदुर्गा उत्सव मंडळ व बाल गणेश मंडळ इंदिरानगर यांच्या सौजन्याने मंडईनिमित्त इंदिरानगरातील इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळेच्या बाजुला बंद शामियानात ‘बाळा! मीच तुझी आई रे’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. या नाटकाचे उद्घाटन भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी या परिसरातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. इतरही मजुरवर्गाने व कामगारांनी कामगार नोंदणी करून कामगारांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिपरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मांडवगडे, अॅड.बाळासाहेब आखाडे, गणेश कुनघाडकर, सागर सातपुते, गजानन नैताम, संदीप दुधबळे, देवानंद खोब्रागडे, देवराव बुरांडे, शुभम भरडकर, जयदेव नैताम, चंदाबाई बुरांडे, प्रकाश भांडेकर, संजय पिपरे, चंद्रकांत भोयर, नरेश खोबे, पोलिस पाटील भास्कर कोठारे, स्वप्नील मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमोद पिपरे यांनी सांगितले की, इंदिरानगर वॉर्ड हा भाजपने वसविला आहे. या वॅार्डाच्या विकासासाठी अनेक कामे केलेली आहेत. त्यात शाळेचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची टाकी, पाईपलाईन, रस्ते, नाल्या तसेच इलेक्ट्रीक खांब उभारले. याशिवाय वॉर्डातील तरुण युवक, नागरिक व महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. मुद्रा लोणच्या माध्यमातून फुटपाथ दुकानदार व छोट्या व्यवसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. याचा फायदा इतरही युवकांनी घ्यावा. कामगार कल्याण कार्यालयातून अनेक मजुरांना फायदा मिळालेला आहे. इतरही मजुर व कामगारांनी कामगार नोंदणी करून कामगारांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ वॉर्डातील अनेक महिलांना मिळालेला आहे. नगर परिषदेकडून कमी व्याजदरात अनेक महिला बचत गटांनी कर्ज घेवून रोजगार सुरू केला आहे. ज्या बचत गटांना आवश्यकता आहे, त्यांनी नगर परिषदेकडे अर्ज करून योजनेचा फायदा घ्यावा. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून नागरिकांनी आरोग्य योजनेचा फायदा घ्यावा, असेही यावेळी पिपरे यांनी सांगितले. गडचिरोली शहरात 131 कोटींच्या नळ योजनेच्या कामाची निविदा निघाली आहे. यामुळे इंदिरानगर तसेच गडचिरोली शहरातील सर्व वॉर्डात दिवसातून दोन वेळेस स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या नाटकाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पंकज नैताम, उपाध्यक्ष कैलाश भांडेकर, सचिव महेश कुकुडकार, शुभम भांडेकर, अमित भांडेकर, नितीन बुरांडे, अनिल नैताम, राज बोबाटे, प्रकाश माहिष्कार, मनोज जवादे, सदानंद सुरनकर, सतीश शेंडे, शोएब पठाण, शुभम गिरसावळे यांच्या सहकार्याने केले होते.