मुलचेरा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यांनी मुलचेरा येथील सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्यांना हात घालत विरोधकांवर फटकेबाजी केली. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागून मला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावर माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, ग्रामीण अध्यक्ष संजीव सरकार, शहर अध्यक्ष दिलीप आत्राम, बासु मुजुमदार, मारोती पेंदाम, विधान वैद्य, संतोष उरेते, दिलीप आत्राम, निखिल हलदार, प्रफुल दुर्गे, परदेशी पाटील, धनंजय विश्वास, तापन मलिक, किशोर मलिक, प्रभाकर नेवारे आदि उपस्थित होते.