आलापल्ली : अहेरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक चर्चेत राहिलेले महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी रात्री आलापल्लीत ठिकठिकाणी कॅार्नर सभा घेऊन आपल्याला साथ द्या, असे आवाहन केले. यावेळी बोचऱ्या थंडीतही नागरिकांनी त्यांच्या सभेसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
धर्मरावबाबा यांनी आलापल्ली येथील टेकडी कॉलनी, बेगर कॉलनी, गोलकर मोहल्ला, पटेल मोहल्ला अशा विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आम्ही बाबांसोबतच राहणार, असा निर्धार व्यक्त केला.
या मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्षांनीही स्पर्धेत येऊन जोर लावला आहे. या बहुरंगी लढतीत धर्मरावबाबांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.