आगामी निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे- नेते

शेतकऱ्यांच्या उपोषणाला दिली भेट

कुरखेडा येथील शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला भेट देऊन मार्गदर्शन करताना मा.खा.डॅा.अशोक नेते

कुरखेडा : भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक 7 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

या बैठकीला माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे तसेच तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जेष्ठ नेते गणपत सोनकुसरे, रविद्र गोटेफोडे, तालुका महामंत्री डॉ.मनोहर आत्राम, सहकार नेते वसंतराव मेश्राम, जिल्हा सचिव रुपाली कावळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.नेते म्हणाले, मोदी सरकारची विकासाभिमुख कामे, तसेच राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवा, हीच विजयाची गुरुकिल्ली आहे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन तालुा महामंत्री विनोद नागपूरकर तर आभार प्रदर्शन भाजपा तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण मुंगणकर यांनी केले.

साखळी उपोषणस्थळाला भेट

या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कुरखेडा येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यत पोहोचवल्या जातील आणि त्यावर लवकर तोडगा काढला जाईल. तसेच या लढ्यात शेवटपर्यंत साथ देत न्याय मिळवून देऊ, असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.