गडचिरोली : सर्व राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्याचीच तयारी म्हणून भाजपने विधानसभा निवडणूक 2024 साठी व्यवस्थापन समितीचे गठन केले आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जबाबदारी दिली असून उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसंयोजकपदी तिघांची वर्णी लागली आहे. त्यात पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खा.अशोक नेते, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे आणि विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाच्या नेत्यांकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राज्याच्या सहसंयोजकपदी अशोक नेते यांची वर्णी लागल्याने विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपापासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंत अनेक जबाबदाऱ्यांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. पूर्व विदर्भातील जागांचे वाटप करताना नेते यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.