गडचिरोली : राष्ट्रमातेचा दर्जा लाभलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गडचिरोली शहरात प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा गडचिरोलीच्या वतीने आराध्य स्थान श्रीक्षेत्र सेमाना देवस्थान परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान, जलाभिषेक कार्यक्रम, महाप्रसाद तसेच मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
प्रमुख पाहुणे म्हणून मा.खा.तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार देशभरात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अहिल्याबाईंचे जीवन हे भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे. समाजसुधारणेच्या कार्यात त्यांचा आदर्श युवकांनी आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, डॉ.चंदा कोडवते, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्ष कविता उरकुडे, मंगेश रणदिवे, कलिम शेख, विवेक बैस, माजी नगरसेविका लता लाटकर, वैष्णवी नैताम, पुष्पा करकाडे, निता बैस, स्वाती चंदनखेडे, वर्षा कन्नाके, ज्योती बागडे, सोमेश्वर धकाते, देवाजी लाटकर, योगिता पतरंगे आदींसह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
मॅरेथॅान स्पर्धेत रोहन भुरसे, साक्षी पोद्दार प्रथम
याप्रसंगी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेची सुरूवात मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी हिरवी झेंडी दाखवुन केली. ही स्पर्धा सायन्स कॉलेज ते श्रीक्षेत्र सेमान देवस्थानपर्यंत होती. यामध्ये मुलांच्या गटातून रोहन भुरसे प्रथम, सौरभ कन्नाके द्वितीय, तर तृतीय क्रमांक अमोल मडावी याने पटकावला. तसेच मुलींच्या गटातून प्रथम साक्षी पोद्दार, द्वितीय वैष्णवी दाते तर तृतीय क्रमांक संघवी कापकर हिने पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
स्वच्छता अभियान आणि महाप्रसाद वितरण
यावेळी क्षेत्र सेमाना मंदिराच्या परिसरात मान्यवरांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविले. तसेच जलाभिषेक महापुजा सुद्धा करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता डॉ.अशोक नेते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिल्पकार शिल्पा भोयर यांनी अहिल्याबाईंची प्रतिमा साकारली. त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रतीभा चौधरी यांना ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.