आ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे जोडे मारो आंदोलन

इंदिरा गांधी चौकात केली नारेबाजी

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे चवदार तळ्याजवळ जाऊन मनुस्मृती जाळण्याचा स्टंट केला. त्यावेळी त्यांनी मनुस्मृती लिहिलेल्या कागदासोबत असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्रही फाडले. या प्रकाराचा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

इंदिरा गांधी चौकात आव्हाड यांच्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. एवढेच नाही तर बॅनरवरील आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव व ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, वर्षा शेडमाके, लक्ष्मी कलंत्री, त्रिषता डोईजड, तालुकाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम, शहर महामंत्री नरेश हजारे, केशव निंबोड, विनोद देवोजवार, विवेक बैस, हर्षल गेडाम, मधुकर भांडेकर, विनोद आकांपालिवार, प्रशांत भृगवार, यशवंत झरकर, लोमेश कोलते, प्रशांत अल्पटवार, प्रा.उराडे, रोहित कन्नाके, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.