गडचिरोली : गडचिरोली मतदार संघात भाजपने बंडोबांना शांत करण्यात यश मिळवून पहिला पडाव पार केला आहे. यासोबत या मतदार संघात प्रचाराची जबाबदारीही निश्चित केली आहे. मतदार संघातील स्टार प्रचारक म्हणून ठिकठिकाणी कॅार्नर सभा घेण्यासाठी 21 जणांची यादी निश्चित करण्यात आली. यात महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र डॅा.देवराव होळी यांना या जबाबदारीपासून थोडे अलिप्त ठेवण्यात आल्याचे दिसून येते.
6 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत ठिकठिकाणी प्रचारसभा घेण्याची जबाबदारी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये गट-ए मध्ये माजी खासदार तथा राष्ट्रीय प्रचारक अशोक नेते, प्रकाश गेडाम, आशिष पिपरे, गट-बी मध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राजू कावळे, बाबुराव कोहळे, लिलाधर भरडकर, डॅा.नितीन कोडवते, गट-सी मध्ये डॅा.नामदेव उसेंडी, रविंद्र वासेकर, रमेश भुरसे, डॅा.भारत खटी, गट-डी मध्ये डॅा.चंदा कोडवते, गीता हिंगे, वर्षा शेडमाके, गट-ई मध्ये योगिता पिपरे, रंजिता कोडाप, कविता उरकुडे, गट-एफ मध्ये डॅा.प्रणय खुणे, रमेश अधिकारी, नंदू काबरा यांचा समावेश आहे.