गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुणे येथील बालेवाडीत पार पडली. या बैठकीत भाजपची भूमिका, महत्वाचे मुद्दे आणि रणनिती ठरविण्यासंदर्भात मंथन करण्यात आले. या बैठकीला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते हेसुद्धा उपस्थित होते.
या बैठकीला लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकाऱ्यांसह वि.प.सदस्य परिणय फुके, आ. डॉ.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा संघटनमंत्री संजय गजपुरे, माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार, माजी सभापती नागराज गेडाम, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुकाध्यक्षा लता पुन्घाटे, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार ,एस.टी.मोर्चाचे कार्यालय प्रमुख नितीन गडकरी, शहराध्यक्ष सारंग साळवे, सोशल मीडियाचे राकेश कोनबतुलवार, तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षबांधणीसोबत विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची भूमिका, महायुतीमधील घटक पक्षांशी समन्वय ठेवत विजयाचे गणित कसे अधिक सोपे करता येईल, यावर या बैठकीत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.