एकजुटीने काम करून गडचिरोली विधानसभेत पुन्हा कमळ फुलवूया

अशोक नेते यांचे चामोर्शीत आवाहन

चामोर्शी : भाजपच्या चामोर्शी तालुका ग्रामीण व शहर जि.प.सर्कल, पंचायत समिती सर्कलची बैठक भाजपच्या तालुका कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेताना माजी खासदार तथा विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते यांनी केंद्र आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने केलेली धडक कामे ही आपल्या कार्यक्षमतेची पावती आहे. त्यामुळे आपण स्थानिक पातळीवर एकजुटीने काम करून गडचिरोली विधानसभेत पुन्हा कमळ फुलवू, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

यावेळी महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, जनसेवेचे व्रत हाती घेऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या कामांना गती देईन, त्यासाठी मला आशीर्वाद द्या, असे विनंतीवजा आवाहन कार्यकर्त्यांना केले.

या बैठकीत प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्र, पंचायत समिती क्षेत्राचे प्रभारी नेमण्यात आले. एका जि.प.क्षेत्रात 11 पदाधिकाऱ्यांची नेमणुक करून प्रभावीपणे काम करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जेष्ठ नेते रामेश्वर सेलुकर, माजी जि.प.सदस्य नामदेवराव सोनटक्के, माजी जि.प.सदस्य प्रकाश कुकुडकर, जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, माणिकचंद कोहळे, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री विनोद गौरकर, जेष्ठ नेत्या आकोली बिश्वास, नगरसेविका तथा भाजप नेत्या रोशनी वरघंटे, माजी जि.प.सदस्य शिल्पा राय, प्रतिमा सरकार, युवा नेते नरेश अल्सावार, ओबीसी नेते भाष्कर बुरे, आदिवासी नेते रेवनाथ कुसराम तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व जि.प.,पं.स.क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.