भाजप महिला आघाडीच्या वतीने घरोघरी महाजनसंपर्क अभियान

सोनापूर कॅाम्प्लेक्सपासून अनेक भाग काढला पिंजून

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने गडचिरोली शहरातील अनेक भाग पिंजून काढत घरोघरी महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. सोनापूर कॉम्प्लेक्स वार्डातील पंचवटी नगरात भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात घर-घर चलो महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. याशिवाय शहरातील रामनगर वॅार्डात भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवून सरकारच्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षाच्या कालावधीत केलेली चांगली लोकोपयोगी कामे, शासनाचे चांगले निर्णय व विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी देण्यात दिली. तसेच शासनाच्या घरकुल, शौचालय, गरीब कल्याण तसेच किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना मोदी सरकारच्या कामांची व विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी लाभार्थी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री तथा शक्ती केंद्र प्रमुख वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष तथा बुथ प्रमुख कविता उरकुडे, भाजप विमुक्त भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे, बुथ प्रमुख संजय मांडवगडे, सलीम शेख, स्वप्नील कोसरे आदी उपस्थित होते.