महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजपकडून विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचा पुढाकार

गडचिरोली : मोदी सरकारला ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून राबविल्या जात असलेल्या महाजनसंपर्क अभियानात पक्षाच्या महिला मोर्चाकडून शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत कर्तबगार महिलांचा सत्कार करण्याचे सत्र धडाक्यात सुरू आहे. महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे.

आधार विश्व फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना योगिता पिपरे व अन्य.

यात पोलीस स्टेशनमधील महिला समुपदेशन केंद्रातील समुपदेशिका वैशाली बांबोळे, आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, सचिव सुनीता साळवे, उपाध्यक्ष विणा जम्बेवार, सदस्य विजया मने, कांचन चौधरी, धनश्री तुकदेव व महिला सदस्यांचा जिल्हा प्रभारी योगीता पिपरे, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय नवेगाव येथील अंगणवाडी केंद्र क्र.217, 216 व 215, तसेच मुरखळा येथील अंगणवाडी क्र. 412 इत्यादी केंद्रांना भेट दिली. या केंद्रांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी नवेगाव अंगणवाडी केंद्र क्र.215 च्या अंगणवाडी सेविका उषा भास्करराव निखाडे आणि अंगणवाडी केंद्र क्र.412 च्या सेविका मयुरी प्रभाकर सोनुले यांचा सत्कार करण्यात आला.

या विविध ठिकाणच्या सत्कार व भेटप्रसंगी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, महिला ओबीसी मोर्चाच्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव पुनम हेमके, ज्योती बागडे, पोलीस महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अमोल किरमिरवार, लनुष्मा रुपी नैताम, प्रणाली नसकुलवार, तेजस्विनी महेंद्र समंत, रुपाली ज्योतिराम होकम, तेजस्विनी सहारे उपस्थित होत्या.

आधार विश्व फाऊंडेशनच्या सत्कारप्रसंगी महिला आघाडीच्या गडचिरोली शहराध्यक्ष कविता उरकुडे, उपाध्यक्ष कोमल बारसाकडे, शहर सचिव पूनम हेमके, नीता बैस, आधार विश्व फाउंडेशनच्या सदस्य प्रिती मेश्राम, प्रिया निशाणे, साधना कंदोटीवार, लता बेहरे, अंजली देशमुख, सुनीता आलेवार, सीमा कन्नमवार उपस्थित होत्या.