कुरखेडा : अंत्योदयाच्या विकासासाठी भाजपा पक्ष हा अगोदरपासून कार्यरत आहे. अंत्योदयाची सेवा हेच भाजपा कार्यकर्त्यांचे संस्कार असून कार्यकर्त्यांनी सेवा, सुशासन पंधरवड्यात सेवेचे व्रत स्वीकारून पंधरवडा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा, असे आवाहन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले. कुरखेडा येथील भाजपा कार्यालयात तालुका कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, सहकार नेते वसंतराव मेश्राम, शहर अध्यक्ष सागर निरंकारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष उल्हास देशमुख, किसान आघाडीचे अध्यक्ष राकेश खुणे, आदिवासी आघाडी अध्यक्ष रमेश पुराम, जिल्हा सचिव रूपाली कावडे, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष रजनीगंधा बनसोड, जयश्री मडावी, शीतल लांजेवार, कविता खडसे, कल्पना मांडवे, शीतल लांजेवार, सुनिता दखने, तालुका महामंत्री प्रा.विनोद नागपूरकर, धर्मा दरवडे, हरिदास कुंजाम, राहुल गिडकर, कृष्णा चंद्रमा, सुखदेव कापगते, अमृत ठलाल, रामकृष्ण मुंगनकर, मंगेश मांडवे व कुरखेडा तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.