गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा संघटन पर्वाअंतर्गत जिल्हा व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) येथे केले होते. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, विदर्भ कार्यालय प्रमुख, महाराष्ट्र सहकार्यालय प्रमुख तथा प्रवासी कार्यकर्ते संजय फांजे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीत भाजपच्या संघटन पर्वाला गती देण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संजय फांजे यांनी जिल्ह्यातील सदस्यता व सक्रिय सदस्यता नोंदणीचा आढावा घेऊन त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी तालुका व मंडळ स्तरावरील सदस्यता नोंदणी आणि सक्रिय सदस्यत्वाचा आढावा सादर केला. डॉ.अशोक नेते यांनी बैठकीचा समारोप करताना, भाजप हा एक परिवार असून, येत्या 6 एप्रिल रोजी पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरी भाजपचा ध्वज फडकवावा. याचबरोबर रामनवमीचा सणही उत्साहाने साजरा करून संघटन पर्वाला गती द्यावी, असे सांगितले.
या बैठकीला आ.डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, सदानंद कुथे, योगिता पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, डॉ.चंदा कोडवते, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जेष्ठ नेते गजानन येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, अरुण हरडे, मोतीलाल कुकरेजा, विनोद आकनपल्लीवार, तसेच जिल्हा व प्रदेश स्तरावरील पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष, महामंत्री, मंडळ अध्यक्ष, महामंत्री आणि मंडळ निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
भाजपा संघटन पर्वाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाच्या भविष्यातील कार्ययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना संघटनेच्या विस्तारावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.