गडचिरोली : गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजप-महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते आणि आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर तालुक्यातील नेरी येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात नेरी-सिरपूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या या बैठकीत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी खा.नेते आणि आ.भांगडीया यांनी सर्वप्रथम समर्थ आडकोजी महाराज, माता मंजुळादेवी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तींचे मनोभावे दर्शन घेऊन उपस्थित भाजपचे नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीत बोलताना खा.नेते म्हणाले, केंद्र शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजनांचा फायदा अनेकांना होत असून त्यात दीन-दलित, शोषित, पिडीत, वंचित या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. ‘अब की बार चारसौ पार, फिर एक बार मोदी सरकार’ असा विजयी संकल्प करून पुन्हा मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी मला विजयी करून सेवेची संधी द्या, अशी विनंती त्यांनी केली.
महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांना विजयी करण्यासाठी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने प्रचाराला लागायचे आहे. प्रत्येक बुथअंतर्गत गावातील, वस्तीतील सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून मोदीजींच्या कार्यकाळातील कामे, जनहिताचे निर्णय, जनकल्याणकारी योजना व भाजपाच्या लोकोपयोगी कार्याला मतरुपी आशीर्वाद आणि समर्थन देण्याचे आवाहन करा, अशा सूचना यावेळी आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिल्या.
यांनी धरली भाजपची कास
आमदार भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्राचा आणि खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व भाजपच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून युवक काँग्रेसचे माजी नेरी शहराध्यक्ष धनराज पंधरे, माजी ग्रा.पं. सदस्य नवतळा वसंता गुरनुले, सिरपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते धनराज गावतुरे, यशवंत गावतुरे, रमेश गुरनुले, रामू गावतुरे, नीलकंठ गावतुरे, पुष्पा कापगते यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार नेते व आमदार भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत वारजूकर, प्रदेश कार्यकाणी सदस्य डॉ.श्याम हटवादे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, सामाजिक नेते नंदु काबरा, उपाध्यक्ष अरुण हरडे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष माया नन्नावरे, चिमूर कृ.उ.बा. समितीचे सभापती मंगेश धाडसे, उपसभापती रविंद्र पिसे, भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव कोकोडे, डॉ.गोपीचंद गजभे, दत्तू पिसे, भाजपा नेरी-सिरपूर जि.प. सर्कलचे प्रमुख संदीप पिसे, माजी जि.प. सदस्य अल्का लोणकर, नेरीच्या सरपंच रेखा पिसे, शहराध्यक्ष नरेंद्र पंधरे, पं.स.सर्कल प्रमुख विलास कोराम, भाजयुमो तालुका महामंत्री पिंटू खाटीक, दिवाकर डहारे, गुरू पिसे, विलास चांदेकर, हरिदास चांदेकर, दिवाकर पिसे, प्रविण कामडी, वसंत कामडी, कन्हैयासिंह भौंड, मदन शिवरकर, रमेश बोलधने, ग्रा.पं. सदस्य संगीता कामडी, ग्रा.पं. सदस्य जनबंधू व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.