गडचिरोली : गडचिरोलीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर लिलाधर सुधाकर भरडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार, दि.12 जानेवारी रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे.

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’
लिलाधर भरडकर मित्र परिवारातर्फे सकाळी 10 वाजता चंद्रपूर रोडवरील डोंगरे पेट्रोल पंपसमोर (पंचवटी नगर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत सामाजिक भान जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
सकाळी 11 वाजता नगरसेवक लिलाधर भरडकर आणि नगरसेविका प्रतिभा अविनाश कुमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यालयामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
सकाळी 10 वाजतापासून सुरू होणाऱ्या उपक्रमांमध्ये समस्त नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निमंत्रक इंजि.लिलाधर भरडकर आणि प्रतिभा कुमरे यांनी केले आहे.
































