
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नवनिर्वाचित नगरसेवक आणि गटनेते लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे मनात काही न ठेवता युतीधर्म पाळत विकास कामांना प्राधान्य द्या, वॅार्डातील नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असा सल्ला यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना दिला.
चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौकाजवळील जनसंपर्क कार्यालयात 12 जानेवारीला भरडकर यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी 27 युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. आपत्कालीन स्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून नगरसेवक लिलधार भरडकर आणि नगरसेविका प्रतिभा कुमरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. त्याबद्दल धर्मरावबाबा आत्राम यांनी कौतुक केले.
यावेळी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष डॅा.सोनल कोवे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, रवींद्र ओल्लालवार, नाना नाकाडे, अॅड.कविता मोहरकर, प्रा.राजेश कात्रटवार, श्रीनिवास गोडसेलवार, सुशिल हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी हिमांशु खरवडे, अमोल कुळमेथे, ऋषिकांत पापडकर, अक्षय भिक्षुनूरकर, लंकेश सेलोटे, सचिन साखरे, अनिकेत पटेल, प्रणय खैरे, रजत पोहाणे, संकेत जनगणवार आदींनी सहकार्य केले.
































