मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज गडचिरोलीत मुक्काम?

नियोजन समितीची बैठक होणार

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतील. त्यानंतर गडचिरोलीत मुक्कामी करतील, असे सांगितले जाते. मात्र रात्रीपर्यंत त्यांचा अधिकृत दौरा जाहीर केलेला नव्हता. (सविस्तर बातमी खाली वाचा)

या दौऱ्यात मुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत काही आत्मसमर्पित नक्षलींचा विवाह सुद्धा लावला जाणार आहे. याशिवाय इतर काही कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

अलिकडे अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, रानटी हत्तींमुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस आणि कंत्राटदारांच्या कोट्यवधीच्या थकित बिलांमुळे जिल्ह्यात अनेक बांधकामांना लागलेला ब्रेक या विषयांना मुख्यमंत्री हात घालणार आणि त्यावर काही बोलणार का, याकडे जिल्हावासियांचे लक्ष राहणार आहे.