गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या व शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत आहे, आणि त्यातूनच मलेरियाच्या रुग्णांचा जीव जात आहे, असा आरोप करत मंगळवारी काँग्रेसने जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयापुढे थाळी वाजवा आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील अनेक पद रिक्त आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत आरोग्य सेविका व कर्मचारी उपलब्ध नाही, अनेक गावांमध्ये औषधीसाठा पुरेसा नाही, अनेक उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे, कोरोनाकाळात उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट लावण्याकरीता टेंडर काढण्यात आले, मात्र काम पूर्ण न झाल्याने अनेक प्लांट धूळखात आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी व सर्व उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे, रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांकडे या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात भर पावसात, ‘गो मलेरिया गो – पालकमंत्री दो- जिल्ह्यातील आरोग्याला प्रशासनाचा खो’ असे म्हणत थाळ्या वाजवून लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, शिक्षक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदु वाईलकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, प्रतिक बारसिंगे, हेमंत मोहितकर, चारुदत्त पोहाणे, स्वप्नील बेहरे, सुभाष धाईत, सुधीर बांबोळे, मजीद सय्यद, नीलकंठ पेंदाम, काशिनाथ गावतुरे, सुधीर बांबोळे, अनिल तुमराम, दिलीप चुधरी, दीपक चौधरी, यादव गेडाम, उत्तम ठाकरे, निखिल पुण्यप्रेडिवार, मिलिंद बारसागडे, राजू सामृतवार, विजय पोवनकार, हेमराज प्रधान, अशोक संदीप, संदीप उईके, अंकुश रामटेके, शामराव बाबनवाडे, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, गौरव येणप्रेडीवार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सुनीता रायपूरे, कविता उराडे, रिता गोवर्धन, शालिनी पेंदाम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.