गडचिरोली : एकीकडे महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांनी ‘एकला चलो रे’चा सूर आळवला असताना महाविकास आघाडी मात्र एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करत आहे. गडचिरोली नगर परिषदेवर सत्ता मिळवण्याचे स्वप्न रंगवत काँग्रेसने येत्या दि.27 रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

आरक्षण सोडतीत गडचिरोलीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. अशा स्थिती पुरूष वर्गाचा हिरमोड झाला असला तरी महिलावर्गाचा उत्साह वाढला आहे. पक्षीय ताकद पाहता महाविकास आघाडीमधून ही जागा काँग्रेस पक्ष लढविणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यासाठी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासह वातावरण निर्मितीसाठी येत्या सोमवारी (दि.27) मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी ॲड.राम मेश्राम, प्रभाकर वासेकर, अॅड.विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, गडचिरोली नगर परीषदेचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या बंगल्यासमोरील मैदानावर सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून आगामी निवडणुका आम्हीच जिंकणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून रणकंदन माजले आहे. मात्र आमच्या महाविकास आघाडीत सर्वच घटक पक्षांमध्ये उत्तम सामंजस्य आहे. आमची लढाई समस्या निर्माण करत असलेल्या महायुतीविरोधात आहे, जागा वाटपासाठी नाही, असे ब्राह्मणवाडे म्हणाले. (अधिक बातमी खाली वाचा)

निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना जिथे ज्या मित्र पक्षाची अधिक ताकद असेल, तिथे त्यांना प्राधान्य देऊ. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि मतदार याद्यांतील घोळ लक्षात घेत असे गैरप्रकार होऊ नये, यासाठी सजग राहात आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ असेही जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे म्हणाले.











