गडचिरोली : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध समित्या जाहीर केल्या आहेत. त्यात राजकीय घडामोडी आणि कार्यकारी समितीत ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. याशिवाय खा.डॅा.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम यांच्यासह सरचिटणीस म्हणून रविंद्र दरेकर, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, तसेच सचिवपदी हनमंतू मडावी, पंकज गुड्डेवार यांची वर्णी लागली. विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.विश्वजित कोवासे यांची प्रदेश काँग्रेसमध्ये सचिवपदी, तसेच युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही सचिवपदी वर्णी लागली आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून देशभरातून 62 युवकांची निवड करण्यात आली. त्यात गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, दुर्गम जिल्ह्यातील युवकाला संधी मिळाल्याने युवक काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसमध्ये गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले आहे.
अॅड.कोवासे यांन आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अलुवेरु, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गटनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी खासदार मारोतराव कोवासे, खासदार डॉ.नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोरे, गडचिरोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी अनेकांना दिले. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांची त्यांच्या निवडीचे स्वागत केले.