गडचिरोली : ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले.
या रॅलीत भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा, आरपीआय, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व विविध संघटनांनी सहभाग घेऊन निदर्शने करून घोषणाबाजी केली. यासह एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक यांच्या समर्थनातील युजीसी बिल लागू करावे, तसेच 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टिईटीपासून मुक्त करावे, यासाठी रॅली काढून धरणे प्रदर्शन करण्यात आले. हा आंदोलनाचा तिसरा टप्पा असून मागण्या पूर्ण न झाल्यास 23 एप्रिलला भारत बंद करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना बामसेफचे जिलाध्यक्ष भोजराज कान्हेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, भारत मुक्ती मोर्चाचे जिलाध्यक्ष प्रमोद राऊत, बहुजन मुक्ती पार्टीचे डोमाजी गेडाम, प्रेमदास रामटेके, नरेंद्र शेंडे, आरपीआयचे चोखोबा ढवळे, दशरथ साखरे, राहुल घोनमोडे, श्रावण मेश्राम , यशवंत वंजारे, लवकुश भैसारे, जैराम उंदिरवाडे, मोरेश्वर निमगडे , दामोधर शेंडे , रोशन उके, जीवन मेश्राम, योगेश वानखेडे, प्रकाश सहारे, सुरेश मेश्राम, योगेश मडावी , सुनंदा बांबोळकर, सुप्रिया मेश्राम, प्रेमलता कान्हेकर, लता रामटेके, प्रेमिला नान्होरीकर, अनन्या उंदिरवाडे, आर्यन उंदिरवाडे, अमिता भैसारे, माया मेश्राम , वृक्षाली उंदिरवाडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
































