Home राजकीय घडामोडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीविरोधात निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीविरोधात निदर्शने

दरवाढ कमी करा, काँग्रेसची मागणी

गडचिरोली : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा तात्काळ पुनर्विचार करून ती दरवाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ₹ 60 तर व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ₹ 150 इतकी दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा मोठा बोजा टाकला आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेले सामान्य नागरिक, गृहिणी, कष्टकरी तसेच लघु व्यावसायिकांचे आर्थिक गणित या दरवाढीमुळे पूर्णपणे कोलमडले असल्याचे सांगत ही दरवाढ मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड.विश्वजीत कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, अनुसचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी जि.प.सदस्य कविता भगत, निकेश गद्देवार, विजय लाड, प्रतीक बारसिंगे, उत्तम ठाकरे, श्रीनिवास ताडपलीवार, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, नदीम नाथानी, स्वप्निल बेहेरे, प्रेमानंद गोंगले, राहुल वैरागडे, कुलदीप इंदूरकर, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकार, जावेद खान, नेहाल आभारे, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, मंजू आत्राम, मीनल चिमूरकर, शेवंता हलामी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.