भामरागड न.पं.मधील विकास कामांना मिळाला २ कोटी ४० लाखांचा निधी

खा.नेते यांचे प्रयत्न, भूमिपूजन व विकास मेळावा

भामरागड : भामरागड नगर पंचायतमधील विविध विकास कामांसाठी खासदार अशोक नेते यांनी विशेष प्रयत्न करून २ कोटी ४० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला. त्यातून विविध प्रभागातील विकासात्मक कामांचे भूमिपूजन आणि विकास मेळावा खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिराच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि आतिषबाजीने खा.नेते यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भामरागड हा भाग अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. याकरिता या भागात नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण विशेष प्रयत्न करुन नगरपंचायतला विकास कामांसाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. नागरिकांच्या सोयीसाठी विकास कामे करणे हेच माझे ध्येय आहे, असे खा.नेते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांविषयी विस्तृत माहिती देत केल्या जाणाऱ्या विकास कामांमुळे नागरिकांना गैरसोय दूर होईल, असा विश्वास यावेळी खा.नेते यांनी व्यक्त केला.

यावेळी भामरागड तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. राजेंद्र तानसेन, शंकर मादावार, श्यामराव कटकेल, नारायण दुंडलवार, सचिन चौधरी, समया कुकरवार, ओमकार पुजलवार, सुरेश कुरसय, गंगाराम आत्राम, योगेश मुरकेल, तुलसीराम दरमसोद, किशोर दुर्गे, शंकर मादावार, शोतया ऊमरवार, दशरथ आजमेरा, सम्या गावडे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात आशा वर्करच्या मानधन वाढीबाबत व तालुक्यातील समस्यांबाबतचे निवेदन खा.नेते यांना देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने मंचावर भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, नगराध्यक्षा रामबाई महाका (हलदार), स्वीकृत नगरसेवक सुनील बिश्वास, शहराध्यक्ष सम्राट मलिक, माजी नगरसेवक प्रा.चालुरकर, माजी जि.प.सदस्य जाकिर हुसेन, अल्पसंख्याक अध्यक्ष शकिल शेख, ता.उपाध्यक्ष जाधव हलदार, महिला आघाडी जि.उपाध्यक्ष भारती ईस्टाम, महामंत्री अनंत बिश्वास, नगरसेवक दलसु सडमेक, नगरसेवक दिलीप उईके, नगरसेविका लक्ष्मी आत्राम, बुथ अध्यक्ष प्रदीप मडावी, आशा वर्कर तसेच तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.