सिरोंचामधील जनसंवाद कार्यक्रमात धर्मरावबाबांची विरोधकांवर फटकेबाजी

विविध पक्षातील कार्यकर्ते आले राष्ट्रवादीत

सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) शुक्रवारी सिरोंचा येथे झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात पहिल्यांदाच तुडूंब गर्दी झाली होती. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधकांवर जोरदार बॅटिंग केली. निवडणुकीच्या तोंडावर त्यांची ही फटकेबाजी चर्चेचा विषय ठरली.

या जनसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तेलंगणा राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.रवींद्र शामला, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष नीलम रामकिष्टम, महिला जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, महिला तालुकाध्यक्ष मनीषा चल्लावार, अहेरी तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, कोंड्रा विश्वेश्वरराव, सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार, नगर सेविका पद्मा भोगे, नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचर्लावार, ओमप्रकाश ताटीकोंडावार, समय्या पसुला, नागेश्वर गागापूरवार, श्रीहरी भंडारी, सत्यनारायण परपटलावार, फाजील पाशा, डेव्हिड बोगी, सुरेंद्र अलोणे, रवी सुलतान, कटकु कोंडय्या आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विशेष म्हणजे यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. सिरोंचा येथील कार्यक्रमाला पहिल्यांदाच मोठी गर्दी झाल्याने हा जनसंवाद कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.फिरोज खान यांनी तर सूत्रसंचालन ॲड.राजेंद्र प्रसाद मेंगनवार यांनी केले. आभार सुरेंद्र अलोणे यांनी मानले.