गडचिरोली : दीपावलीच्या पावन पर्वावर शिवसेनेचे (उबाठा) सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात शिवसैनिकांचा स्नेहमिलन सोहळा अमिर्झा येथील ‘गुरूमठ’ या पावनस्थळी पार पडला. यावेळी कात्रटवार यांनी प्रेमाचा गोडवा वाटून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी
मार्गदर्शन करताना अरविंद कात्रटवार यांनी शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणले. शिवसेनेचा जन्म संघर्षातून झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लढवय्या बाणा जोपासून शिवसेना निर्माण केली. ही शिवसेना महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक आहे. कितीही संकटे आली तरी कट्टर शिवसैनिक हा घाबरणारा नसून तो लढणारा आहे. संकटांचा सामना संघर्ष व एकजुटीने करा, असा मुलमंत्र बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना दिला आहे. बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा व प्रेम कायम ठेवून उध्दवसाहेबांच्या शिवसेनेची ताकद गावागावत बळकट करा, असे आवाहन यावेळी कात्रटवार यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी ज्यांना
मायेची ऊब दिली आणि मोठ्या पदापर्यंत पोहचविले त्यांनी दगाबाजी करून आपला वेगळा संसार थाटला आहे. त्यांना राज्याच्या विकासाची व जनतेची काळजी नसून ते केवळ मोहमायेत अकडले आहेत. यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पण नुकसानभरपाई देण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव दिला जात नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्थैर्य देण्याचे काम राज्यातील सरकार करीत नसल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज राहा, असे कात्रटवार म्हणाले.
यावेळी उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, संजय बोबाटे, अमित बानबले, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वेलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.