स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरीता सज्ज व्हा

माजी गृहमंत्री देशमुख यांचा सल्ला

गडचिरोली : येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन करावे. आघाडीबाबत निर्णय करण्याची पूर्ण मुभा स्थानिक नेतृत्वाला असेल. तेव्हा योग्य तो निर्णय आपल्या सोईनुसार करण्यास हरकत नाही, असे मार्गदर्शन राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल देशमुख यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील हॉटेल लॅण्डमार्कमध्ये पार पडली. या बैठकीला अनिल देशमुख यांच्यासह माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरीक्षक अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, प्रदेश सरचिटणीस शरद सोनकुसरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश चिटणीस अॅड.संजय ठाकरे, प्रदेश चिटणीस ओम शर्मा, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, प्रदेश युवक सरचिटणीस करण गण्यारपवार, युवक जिल्हाध्यक्ष हिमांशू देशमुख, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वृषभ गोरडवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हुसेन शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले, या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा आज मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना खताच्या तुटवडयाचा सामना करावा लागत आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग होणार्‍या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा अतोनात नुकसान होते, मात्र भरपाई मिळाली नाही. शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तसेच बोनस शेतकर्‍यांना मिळाले नाही. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था बघायला मिळत आहे. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.

डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मार्गदर्शन करताना सहकार क्षेत्रातील ताकत राजकारणात अतिशय महत्वाचा भाग असून, अतुल गण्यारपवार यांच्या रूपाने आपल्या जिल्ह्यात ती ताकत मिळाली आहे. मी सहकार क्षेत्र चांगल्या प्रकारे जाणतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या ताकदीचा उपयोग करून यश संपादित करावे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी जिल्ह्यातील संपूर्ण समस्यांची जाणीव करून दिली. तसेच पक्षाला जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवून पक्षाचे नेते शरद पवारांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की यश संपादन करू, पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, चामोर्शी कृ.उ.बा.स.उपसभापती परमानंद मल्लिक, कोरची तालुका अध्यक्ष प्रताप गजभिये, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर भेंडारे, तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर बुरे, खरेदी विक्री संघ चामोर्शीचे माजी अध्यक्ष गुरुदास चुधरी, अहेरी तालुकाध्यक्ष रमेश चुक्कावार, एटापल्ली तालुका अध्यक्ष संतोष समुद्रलवार, आरमोरीचे सदाशिव भांडेकर, धानोरा तालुकाध्यक्ष बाळू उंदीरवाडे, मधुकर चिंतलवार, चामोर्शी तालुका अध्यक्ष कबीर आभारे गडचिरोली तालुका अध्यक्ष मनोहर भोयर, वडसा तालुका अध्यक्ष क्षितिज उके, वडसा शहर अध्यक्ष अशोक माडावार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष राजन खुणे, चामोर्शी महिला तालुकाध्यक्ष कुंदा जुवारे, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर यांच्यासह जिल्ह्यातील संपूर्ण प्रदेश पदाधिकारी, तसेच बाराही तालुक्यातून जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.