एससी-एसटी संसदीय समितीचे अध्यक्ष फुलस्ते यांची नेते यांच्या निवासस्थानी भेट

स्थानिक मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा

गडचिरोली : गडचिरोली लोकसभेसाठी प्रभारी म्हणून आलेले अनुसूचित जाती / जमाती संसदीय समितीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी गडचिरोली येथील दौऱ्यात माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अशोक नेते यांच्यासह त्यांच्या धर्मपत्नी अर्चना नेते यांनी औक्षण करत पुष्पगुच्छ देऊन कुलस्ते यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, अविनाश विश्रोजवार, महादेव पिंपळशेंडे यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत त्यांना निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली.