अन्न व औषध प्रशासन मंत्री आत्राम 18 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर

अहेरीत आज कव्वालीचा दुय्यम मुकाबला

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम शनिवार 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अहेरी येथे पोहोचतील. धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लब अहेरीच्या वतीने दसऱ्यानिमित्त शनिवारी जुन्या तहसील कार्यालयाजवळील पटवर्धन मैदानात सायंकाळी सात वाजतापासून कव्वालीचा जंगी दुय्यम मुकाबला रंगणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना.धर्मरावबाबा आत्राम करतील.

रविवार, दि.13 रोजी सायंकाळी ना.आत्राम देवीच्या विसर्जन उत्सवात सहभागी होतील. सोमवारी सकाळी 9.30 वाजता अहेरी येथून गोलाकर्जी, राजाराम खांदलामार्गे छल्लेवाडाकडे जातील. सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान छल्लेवाडा येथे आगमन व जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 ते 3 हा वेळ राखीव असून त्यानंतर अहेरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 वाजता नवभारत-नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार कार्यक्रमास अहेरी येथे उपस्थित राहतील. मंगळवार, दि.15 रोजी सकाळी 9.15 वाजता प्राणहिता हेलिपॅडवरून भामरागडकडे जातील. सकाळी 10 वाजता भामरागड येथे देवीचे दर्शन घेऊन 10.45 वाजता अहेरीकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता ग्रामरोजगार सेवक संघटना गडचिरोलीतर्फे त्यांचा जाहीर सत्कार वासवी सेलीब्रेशन हॉल अहेरी येथे होणार आहे.

बुधवार, दि. 16 रोजी त्यांचा वेळ अहेरी निवासस्थानी राखीव आहे. दि.17 रोजी 9.30 वाजता सिरोंचाकडे प्रयाण. सिरोंचा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम करतील. शुक्रवार, दि. 18 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सिरोंचा येथे जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता हेलिपॅड सिरोंचा येथून अहेरीकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता प्राणहिता हेलिपॅड अहेरी येथे आगमन व राजवाडा निवासस्थानी मुक्काम करतील.

अहेरीत कव्वालीचा दुय्यम मुकाबला

धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लब अहेरीच्या वतीने दसऱ्यानिमित्त शनिवार 12 ऑक्टोबर रोजी जुन्या तहसील कार्यालयाजवळील पटवर्धन मैदानात सायंकाळी 7 वाजतापासून कव्वालीचा जंगी दुय्यम मुकाबला होणार आहे. प्रसिद्ध कव्वाली गायक (कव्वाल) जुनेद सुलतानी आणि सुप्रसिद्ध गायिका गुलतान साबरी (कव्वाला) यांच्यात हा मुकाबला होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मरावबाबा आत्राम हे करणार आहेत. यावेळी प्रामुख्याने रवींद्रबाबा आत्राम, तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम, रामेश्वररावबाबा आत्राम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा अलोणे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, लक्ष्मण येरावार असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.