सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करणार – प्रा.बारसागडे

पोर्ला जि.प.सर्कलकडून सत्कार

गडचिरोली : सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करणार असून, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्यावर आपला भर राहील. त्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे काम करणार, असे प्रतिपादन नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी केले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

पोर्ला जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व कार्यकर्त्यांनी प्रा.बारसागडे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी पं.स.उपसभापती व भाजपचे जिल्हा सचिव विलास केशवराव दशमुखे यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी सभापती मारोतराव ईचोडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूजी फरांडे, नागरी येथील सरपंच भूमिका बारसागडे, नवेगावचे उपसरपंच राजू खंगार, भाजपचे नेते लोमेश कोलते, पांडुरंग समर्थ, ग्रामपंचायत सदस्य अनु वाघरे, रवि सेलोटे, पांडू भोयर, विनोद म्हशाखेत्री, संतोष दशमुखे, युवा कार्यकर्ते बंटी उपासे, पंकज येवले, अशोक चापले, प्रभाकर लाडवे, लोमेश मुरकुटे, सचिन एनप्रेड्डीवार, लोमेश कलसार, मोहन गेडाम, गोपाल गेडाम, गोकुळ भोयर, धामदेव भोयर, मनोज किरमिरे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.बारसागडे यांचे स्वागत व सत्कार करून शुभेच्छा दिल्या.