अ.भा.रिपब्लिकन पक्षातर्फे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सत्कार

बॅरि.खोब्रागडे जन्मशताब्दीचे औचित्य

गडचिरोली : रिपब्लिकन चळवळीचे सरसेनानी तथा राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ रिपब्लिकन व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार येथील केमिस्ट भवनात गुरूवारी (दि. 25) दुपारी करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते धर्माजी बांबोळे, माणिकराव तुरे, डॉ.मारोतराव रायपुरे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव प्रा.प्रकाश दुधे, केशवराव सामृतवार, विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, भारतीय बौध्द महासभेचे प्रा.गौतम डांगे, महिला आघाडी प्रमुख निता रायपुरे, वनमाला झाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी रिपब्लिकन पक्ष तथा आंबेडकरी चळवळीत निष्ठापूर्वक काम करणाऱ्या 50 हून अधिक ज्येष्ठ व वयोवृध्द कार्यकर्त्यांचा शाल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रल्हाद दुबे, एकनाथ खोब्रागडे, लालाजी उंदिरवाडे, केशरी रायपुरे, यादवराव जांभुळकर, कवडू उंदिरवाडे, रामदास राऊत, सखाराम लाडे, नारायण भैसारे, रत्नमाला उंदिरवाडे, एकनाथ नंदेश्वर, मणिराम सोरते आदींचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता.

यावेळी बोलताना रोहिदास राऊत यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या रिपब्लिकन चळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून ही चळवळ संपूर्ण देशात पसरविण्याचे व दलित-शोषित लोकांचा आवाज बुलंद करण्याचे अतुलनीय कार्य केल्याचे सांगितले. या चळवळीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. इतर मान्यवर पाहुण्यांनी सुध्दा ही चळवळ गतीमान आणि मजबूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

दिवसभर मुसळधार पाऊस असूनसुध्दा जिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक खोब्रागडे, हेमंत सहारे, जगन जांभूळकर, नरेंद्र रायपुरे, पुंजाराम जांभूळकर, तैलेश बांबोळे, दर्योधन सहारे, सुखदेव वासनिक, रमेश बारसागडे, रेमेंद्र सहारे, भरत जांभूळकर, चंद्रभान राऊत, रमेश शेंडे व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.