गडचिरोली जिल्ह्यातील ४०० भाविक निघाले अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून व्यवस्था

गडचिरोली : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरातील रामलल्लाचे दर्शन घेण्याची ईच्छा अनेकांना आहे. परिस्थितीने सामान्य असलेल्या अशा ४०० भाविकांना अयोध्येला नेऊन मोफत दर्शन घडविण्याची व्यवस्था अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने करण्यात आली. बुधवारी (दि.२८) १० बसेसमधून त्यांना अयोध्येकडे रवाना करण्यात आले.

अयोध्येत भगवान श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील भाविकांची अयोध्येत रीघ लागली असताना गडचिरोलीतील भाविकांनाही ही संधी मिळावी यासाठी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांना सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ईच्छुक भाविकांची निवड करून त्यांना बुधवारी १० बसगाड्यांमधून अयोध्येसाठी रवाना करण्यात आले.