देसाईगंज : तालुक्यातील शिवराजपूर येथील ग्रामपंचायत सभागृहात कुरुड-कोकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांचा मेळावा भारतीय जनता पार्टी तालुका देसाईगंज ग्रामीणच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रोशनी पारधी होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सिंचन विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी माणिक बनसोड, माजी उपसरपंच वासुदेव झिल्पे, कल्पतरू असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादे आदींची उपस्थिती होती. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी लोककल्याणकारी मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळातील बहुजन आणि गरीब कल्याणाच्या योजना कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवाव्या असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रोशनी पारधी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी परिसरातल्या गावांमधील इमारत बांधकाम कामगार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आयोजक तालुका अध्यक्ष सुनील पारधी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आदित्य मिसार, विकास पारधी, सुनील राऊत, माजी ग्रा.पं.सदस्य मंजुषा मेश्राम, शाळा समिती अध्यक्ष प्रमोद बेद्रे, भूमेश्वर पारधी कोंढाळा यांनी परिश्रम घेतले.