गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीन नगर परिषदेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. जिल्हाभरात 137 इच्छुक उमेदवारांनी जिल्हा निवड समितीसमोर मुलाखती दिल्या. त्याचप्रमाणे भाजपच्या गडचिरोली नगर परिषदेसाठी ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून आज (दि.8) देसाईगंज आणि आरमोरी नगर परिषदेच्या मुलाखती होतील, असे निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे यांनी सांगितले.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमधून कुठे कोणाला उमेदवारी द्यायची याची घोषणा लवकरच प्रदेशस्तरावरून केली जाणार आहे.
काँग्रेसकडून गडचिरोलीत नगराध्यक्षपदासाठी 2 आणि नगरसेवकपदासाठी 37, आरमोरीकरिता नगराध्यक्षपदासाठी 3, तर नगरसेवकपदासाठी 50, तसेच देसाईगंज येथे नगराध्यक्षपदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 42 असे एकूण 137 अर्ज प्राप्त झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
काँग्रेसच्या जिल्हा निवड समितीत जिल्हा निरीक्षक सचिन नाईक, आमदार रामदास मसराम, गडचिरोली विधानसभेचे निरीक्षक संदेश सिंगलकर, अहेरी विधानसभा निरीक्षक संतोष रावत, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश महासचिव रवींद्र दरेकर, प्रदेश महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश महासचिव हनुमंतू मडावी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, सेवादल जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आरिफ कनोजे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, तसेच एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी उपस्थित होते.
































