गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील जनसन्मान यात्रा शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी आलापल्ली येथे येणार आहे. सकाळी 11 वाजता त्यांचे हेलिकॅाप्टरने अहेरी येथे आगमन होणार आहे. सकाळी 11.15 वाजता ना.पवार यांच्या उपस्थितीत राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम होणार आहे.
सकाळी 11.45 वाजता सावरकर चौक आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपरिक नृत्याचे सादरीकरण आणि दुपारी 12 वाजता वन विभागाच्या मैदानावर, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा आणि शेतकरी तथा लाडक्या बहिणींशी संवाद करतील. दुपारी 2.15 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव आणि दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.
दुपारी 12 ते 2 वाजतादरम्यान आलापल्ली येथील क्रीडा संकुलात शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी संवाद साधला जाणार आहे. तत्पूर्वी नागेपल्ली येथे सकाळी 11.15 वाजता महिलांशी संवाद आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम रेड्डी कॅाम्प्लेक्स, अहेरी रोड येथे होणार आहे. यावेळी ना.पवार यांच्यासोबत ना.धर्मरावबाबा आत्राम आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहतील.
ना.धर्मरावबाबा दि.5 ते 8 सप्टेंबरदरम्यान अहेरी दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.