गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल दि.15 मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या एक दिवसाच्या भेटीत ते आरमोरी, मानापूर आणि गडचिरोली येथे भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतील.
गुरुवार दि.15 मे रोजी दुपारी 1 वाजता आरमोरी येथे आगमन व अमृत योजना 2.0 अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमास ना.जयस्वाल उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता मौजा मानापूर ता.आरमोरी येथे आगमन व जंगली हत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावाची पाहणी करतील.
दु.2.30 वाजता मानापूर येथून गडचिरोलीकडे प्रस्थान करतील. दु.3 वाजता जिल्हा नियोजन भवन, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे येऊन त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता रामटेककडे प्रयाण करतील.