सहपालकमंत्री अॅड.जयस्वाल यांचे भाजप कार्यालयात स्वागत

समस्यांवर सकारात्मक संवाद

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांच्या देसाईगंज दौऱ्याच्या वेळी भाजप जनसंपर्क कार्यालयात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी त्यांना भगवा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

या भेटीदरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामे, नागरी समस्या व कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर बांधीलकीने चर्चा झाली. सहपालकमंत्री जयस्वालजी यांनी सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे व विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना मिळालेली तत्परता आणि मंत्री जयस्वाल यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.