गडचिरोली : उद्योगविरहित गडचिरोली जिल्हा लॅायड्स मेटल्सच्या कोनसरी येथील लोहप्रकल्पामुळे औद्योगिक नकाशावर येत आहे. यासोबत देवलमरी परिसरातील भूगर्भात असलेल्या चुनखडीच्या साठ्याचे उत्खनन करण्याचे काम अदानी आणि बिर्ला गृपला मिळाले आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोलीच्या भागात या कंपन्यांचे सिमेंट कारखाने उभे होतील, अशी माहिती माजी राज्यमंत्री आणि अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ‘कटाक्ष’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लॅायड्स पाठोपाठ अदानी आणि बिर्ला गृपही येणार गडचिरोलीत
महाविकास आघाडीकडून लोकसभेचा उमेदवार मीच- धर्मरावबाबा