धर्मरावबाबांसाठी एकवटली महायुती, आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांना उर्जा

कामगिरीवर पुन्हा सरकार येणार- नेते

अहेरी : महायुतीच्या वतीने ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी महायुतीमधील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन एकजुटीने धर्मरावबाबांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला. यावेळी सरकारची धडक कामगिरी आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार विराजमान होईल, असा विश्वास यावेळी मंत्री धर्मरावबाबांसह माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते यांनी व्यक्त केला.

या बैठकीत महायुतीच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकार्‍यांचे महत्त्वाचे विचार आणि निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी ना.आत्राम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला. उपस्थित सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत ना.आत्राम यांच्या विजयासाठी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढल्याचे दिसून आले.

येथील वासवी हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी खासदार अशोक नेते, भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँगेस काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलु हकीम, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, सतीश गंजीवार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर डेकाटे, मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, सिरोंचाचे माजी पंचायत समिती उपसभापती रहीम, भाजपचे भामरागड तालुकाध्यक्ष सुनील बिश्वास, शिवसेनेचे (शिंदे) मुलचेरा तालुकाध्यक्ष गौरव बाला, अहेरी तालुकाध्यक्ष अक्षय करपे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पौर्णिमा इश्टाम, युधिष्ठिर बिश्वास, मधुकर कल्लूरी, रमेश मारगोनवार, रमेश समुद्रालवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कामे सांगण्यात कमी पडलो – नेते

केद्र आणि राज्य सरकारच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे अहेरीसह संपूर्ण जिल्ह्यात अनेक कामे मार्गी लागली आहेत. साडेचौदा हजार कोटींची रस्त्याची कामे झाली आहेत. काही ठिकाणी वनकायद्याच्या अडचणीमुळे कामे थांबली असेल तर त्यात लोकप्रतिनिधीचा दोष नसतो. पण ती कामे पूर्ण होणारच आहेत. गेल्या अनेक वर्षात जे प्रश्न सुटले नाही ते आता सुटत आहेत. लवकरच रेल्वेलाईनसुद्धा या भागातून जाईल. या भागाला औद्योगिक नकाशावर आणणारा आणि हजारो हातांना रोजगार देणारा सुरजागड, कोनसरीसारखे प्रकल्प आले. चांगल्या आरोग्य सुविधाही आता मिळत आहेत. यामुळे पारंपरिक पद्धतीने जगणार्‍या लोकांच्या राहणीमानात बदल झाला. ही विकासात्मक कामे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यात लोकसभेच्या वेळी कमी पडलो. पण आता ती चूक होऊ देऊ नका. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता धर्मरावबाबांसारख्या खंबीर नेतृत्वाला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते रियाजभाई शेख, हर्षवर्धन राव आत्राम, राष्ट्रवादी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,राष्ट्रवादीचे नेते रिंकुभाऊ पापडकर, तालुकाध्यक्ष अर्जुनजी आलाम,युवा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार, विजयभाऊ नर्लावार, बाबुराव गंफावार, विनोदभाऊ आकनपल्लीवार, सुनील विश्वास,सागरभाऊ डेकाटे, शिवसेनेचे नेत्या पौर्णिमा ईटॅाम्, अंकुश मंडल, तसेच महायुतीचे सन्मानित मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.