कोरची : तालुक्यातील कोटगुल, मसेली या भागात सोमवारी केलेल्या संवाद दौऱ्यात आमदार कृष्णा गजबे यांचे गावकऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. विशेषतः तरुण आणि वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्ही तुमच्यासोबत आहे, असा विश्वास आ.गजबे यांना दिला. यादरम्यान काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी गजबे यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार गजबे यांनी घरोघरी भेटी देऊन प्रत्येक कुटुंबियांसोबत संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबत त्यांना विकासात्मक योजनांची माहिती दिली. यामुळे सकारात्मक आणि उत्साही वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. भाजपच आमचा आमचा विकास करू शकतो. लाडकी बहिण योजनेसारख्या योजना आज आमच्या आई, ताईंना मिळत आहेत. त्याचा फायदा कुटुंबाला होत आहे. यावर्षी उत्साहात दिवाळी साजरी करणे फक्त महायुती सरकारमुळे शक्य झाले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा सचिव आनंद चौबे, तालुका महामंत्री गुड्डू अग्रवाल, तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, जिल्हा पदाधिकारी देवराव गजभिये, तालुका उपाध्यक्ष राजकुमार नाईक, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुरेश काटेंगे, उपसरपंच अनिल जनबंधू, दिलीप कोवाची, हेमंत कुंबरे, नाराजी फुलारे, राजू शेखावत, नीलकंठ जाडे, रामलाल मुलेठी, ईश्वर कुरीटी, ईश्वर कुंबरे, माखन घोडेला, हेमंतलाल नैताम, केशव विनायक यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरची तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यात गजानन कुमरे, विलास कुमरे, सर्कस धुर्वे, गोविंद कुंभरे, गोवर्धन ताराम, मनोज कुमरे, जागेश्वर नरोटे, प्रमिला नरोटे, श्यामृत पुडो, अर्जुन पुडो, संजय नरोटे, अवधराम कार्यपाल, रुखमन जाटा, संतराम सोट्टी, बजरंग मिरी, शालिक बोरी, रवी नैताम, व्यसनराय कपूर, बरातू मडावी, रामधीन सोनवणी, विनोद काटेंगे, कामेश टेकाम, बालीराम पोरेटी, गणेश धुर्वे, सुकराम कुमरे, महेंद्र गावडे, नाहीर्सिंग भेसा, रोहित हलामी, अमन दाणे, चेतन सोनकुकरा, पंकज मडावी, देवराम मडावी, दुर्गसिंग नरोटे, संपत नरोटे, महेंद्र कापुरडेहारिमा, दुलार्सिंग नरोटे, चमूराम काटेंगे, ग्यानसिंग नैताम, रवींद्र झाडे, शंकर जोरी, नंदू कुमरे, संदीप कुंमरे, तीकेश्वर मडावी, नाशिक बोरी, दीपक बोरी, कपूरदास कापुर्डेहारिमा, चरण कुमार मोत्याकुंवर, गणपत भावर, रुखमान ताराम, जितेंद्र मोत्याकुंवर, गजानन सोनेसिंगार, इंदल नरोटी, योगेश ताराम, भागवनसिंग झोरी, गैतराम मोत्याकुंवर, मैजूराम ताराम, मनीत मुलेटी, पतीराम कल्लो, सोमनाथ कुमरे, उदयसिंग हलामी, रुपसाय हलामी, कुदूरसाय उइके, मुकुंद सहारे, दमरसिंग पुडो आणि आनिराम बोगा यांचा समावेश होता.
मसेली येथील जनसंवाद दौऱ्यात मोठ्या प्रमाणावर उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या दौऱ्यात मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश होता हे विशेष.