पायाभूत सुविधा बळकट करणारा शेतकरी, युवक, महिलांसाठी कल्याणकारी अर्थसंकल्प

आ.कृष्णा गजबे यांच्याकडून स्वागत

गडचिरोली : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात दि.२७ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेला सन २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, गरीब, युवक, महिला या ४ प्रमुख घटकांचा सर्वांगीण विकास व कल्याण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत संकल्पनेनुसार अर्थसंकल्पात प्राधान्याने रस्ते, वीज, आरोग्य या मुलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी कल्याणकारी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे, असे खा.गजबे यांनी सांगितले.