राष्ट्रवादी काँग्रेसने (श.प.गट) केला गडचिरोलीत सरकारविरोधात घंटानाद

काय म्हणणे होते, पहा व्हिडीओ

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने गुरूवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांच्यामागे लावलेल्या ईडी-सीबीआयच्या ससेमिऱ्याचा निषेध करण्यासोबत महागाईविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती आणण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. विविध करांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लुटून सरकार आपली तिजोरी भरत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. दुसरीकडे सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांना ईडी-सीबीआयचा धाक दाखवून त्रास दिला जात आहे. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सुरेश सा.पोरेड्डीवार, प्रदेश चिटणीस अॅड.संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता मुजूमदार (राऊत), सामाजिक न्याय विभागाचे इंद्रपाल गेडाम, ओबीसी सेलचे शेमदेव चाफले, सेवादल अध्यक्ष अमर खंडारे, अल्पसंख्याक सेलचे हुसेन शेख, नईम शेख, प्रमिला रामटेके, संध्या उईके, मोहन पाल, इंद्रपाल गेडाम, मिनल चिमुरकर, निता बोखाटे, मल्लया कालवा, सुनील चिमुरकर, रामचंद्र भांडेकर, शाहरूख पठान, नरेश कंदीकरवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.