नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग

सागर निंबोरकर यांचा पक्षप्रवेश

सागर आणि पत्नी प्रणोती निंबोरकर यांचे पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत करताना डॅा.कोठेकर, डॅा.नेते.

गडचिरोली : शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांनी सपत्निक आणि अनेक कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, माजी खासदार डॉ.अशोक नेते आणि आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या सोहळ्यात शहरातील तरुण वर्ग, महिला आणि विविध मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून भाजप परिवारात नवऊर्जेचा संचार केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उपेंद्र कोठेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते उपस्थित होते. याशिवाय गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सा.पोरेड्डीवार, माजी आमदार कृष्णा गजबे, डॉ.नामदेव उसेंडी, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गिता हिंगे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जेष्ठ नेते सुधाकर येन्गंदलवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

भाजपा म्हणजे राष्ट्रनिर्मितीचे आंदोलन—डॉ.कोठेकर

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.उपेंद्र कोठेकर म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय संघटना नसून राष्ट्रनिर्मितीचे महान आंदोलन आहे. मोदीजी व फडणवीसजींच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेकडे झेपावत आहे. गडचिरोलीतील या उत्साहवर्धक पक्षप्रवेशामुळे भाजपा परिवार अधिक सबळ आणि जनतेच्या विश्वासाशी घट्ट जोडला गेला आहे,” असेही ते म्हणाले.

गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीच्या अभियानाला आता नव्या उमेदीनं गती मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे गडचिरोलीच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडणार हे स्पष्ट दिसत आहे.