Home राजकीय घडामोडी कोरचीत पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान वर्गाची सांगता

कोरचीत पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान वर्गाची सांगता

मा.आ.कृष्णा गजबे यांचे मार्गदर्शन

कोरची : येथील मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान वर्गाचे शालेय सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष नसरुद्दीन भामाणी, जिल्हा सचिव आनंदी चौबे, भाजपा तालुकाध्यक्ष सदानंद नरोटी, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान कोसमी येथील ब्रह्मा जुमानसिंग हलामी यांनी भाजपचा दुपट्टा घालून पक्षात प्रवेश केला. या उपक्रमाने पक्षाची ताकद वाढली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

आपल्या सरकारची कामगिरी या विषयावर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले, “फक्त योजना जाहीर करणे हा उद्देश नसून जनकल्याण आणि सक्षमीकरण हेच खरे लक्ष्य आहे. लाभार्थी तयार करणे नव्हे, तर जबाबदार नागरिक घडवणे हाच उद्देश आहे.”

दृष्टी आणि संकल्प

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही दृष्टी घेऊन समाजातील प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा 100 टक्के लाभ पोहोचवणे; एकही पात्र व्यक्ती वंचित राहू नये याबद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या सत्राने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, स्थानिक विकासासाठी नवी उर्जा मिळाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी पक्षाच्या आदर्शांना वचनबद्ध राहण्याचा संकल्प केला.