कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आज गडचिरोलीत

रायपूरच्या ग्रामसभेला हजेरी

गडचिरोली : राज्य कृषी मूल्य आयोग आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल आज (दि.3) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते गडचिरोली तालुक्यातील रायपूर येथे होणाऱ्या ग्रासभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि ग्रामसभा सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारे पाशा पटेल यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. अशा दर्जाची व्यक्ती प्रथमच एका ग्रामसभेला उपस्थित राहणार असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. सायंकाळी 6 वाजता ही ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार डॅा.देवराव होळी यांनी केले आहे.