सिरोंचा तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशमालिका सुरूच, दुपट्ट्यांनी स्वागत

युवकांसह महिलांमध्ये वाढला उत्साह

सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम हे रविवारपासून तीन दिवसीय दौऱ्यावर सिरोंचा तालुक्यात आले. दरम्यान या तालुक्यातही त्यांच्या पक्षात येण्यासाठी आणि धर्मरावबाबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अनेकांनी उत्सुकता दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यात जाफ्राबाद, टेकडा व अन्य गावातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. घड्याळ चिन्हाचे दुप्पटे टाकून धर्मरावबाबा यांनी त्यांचे स्वागत केले.

सिरोंचा तालुक्यात पक्षप्रवेशाची मालिका सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नव्याने उभारी घेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने धर्मरावबाबांचा विजय होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.

लाडकी बहिण योजनेमुळे प्रामुख्याने जाफ्राबाद येथील महिला सगुणा सिडाम, बुज्जी आत्राम, विमला आत्राम, दुर्गाक्का आत्राम, चिलक्का पोरतेटी, लक्ष्मी आत्राम, दुर्गक्का पोरतेटी, शशिकला आत्राम, नारक्का गावडे, दुर्गाका बापू आत्राम, संजेरानी पोरतेटी, शारदा आत्राम आदी महिलांचा समावेश आहे. तसेच जाफ्राबाद येथील बोरकुटा सांवलू, सुरेश गजल्ला, प्रमोद बोरकुटे, व्यंकटी दुर्गम, बापू गोलेट्टी, रमेश गंधर्ला, राजेश कांदारी, बकय्या बोरकुटे, तिरुपती दुर्गम, किरण गोलेट्टी, वंगला शेखर, कोनम दामलू आदींचा समावेश आहे.

धर्मरावबाबा आत्राम हे अनुसूचित जमाती अर्थात एस.टी. समाजासाठी आमदारकी व मंत्रीपदाची पर्वा न करता भूमिका मांडतात. त्यामुळे जाफ्राबाद येथील अनुसूचित जमातीचे नेते माजी सरपंच जेगय्या पोरतेटी, मुतय्या पोरतेटी, सुरेश गावडे, व्यंकटी आत्राम, कुंकमया पोरतेटी, प्रभाकर पोरतेटी, रुपेश आत्राम, नंदू देवनेटी, रमेश कुमरी, सुरेश पोरतेटी, भिमया बामनपल्ली आदींनी धर्मरावबाबा यांच्यासोबत काम करण्याची ईच्छा व्यक्त करत पक्षप्रवेश केला.

टेकडा येथील शंकर अंबिलेपू , विजय अंबिलेपू, पुलाला व्यंकटेश, कोमुल्ला श्रीनिवास, रागम श्रीनिवास, रागम नागेश, गोडम शेखर , सडमेक लक्ष्मण, गोडम रमेश, रगम्म बोलय्या, पुपाला निखिल, नीलम व्येंकटस्वामी, कटकु प्रसाद, कटकू श्रीनिवास, कटकु राजू, बारसांगडी गड्डी, तिरुपती पेद्दी, रेमाका सुरेश, तोकला पोचम, ताटपली रमेश, गगुरी दुर्गया, अंबिलपू बापू, बुटली पोचन्ना आदींनी पक्षप्रवेश केला.