Home राजकीय घडामोडी हवेच्या दिशेने वाहत आहेत कार्यकर्ते, अनेक जण आविसंकडून राष्ट्रवादीकडे

हवेच्या दिशेने वाहत आहेत कार्यकर्ते, अनेक जण आविसंकडून राष्ट्रवादीकडे

धर्मरावबाबांच्या सभांना वाढली गर्दी

अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण जसजसे तापत आहे तसतसी निवडणुकीतील हवेची दिशाही फिरत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सभांना वाढलेली गर्दी पाहून आविसंच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) वाट धरली. रंगयापल्ली येथे दि.10 रोजी राष्ट्रवादीचे सिरोंचा येथील नगरसेवक सतीश भोगे यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.

पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बानय्या दुर्गम, व्यंकटी वडगुरी, महेश शेंडे, बापू कटलावार, सडवली लेंडगुरी, सडवली गुरुनुले, राजन्ना दुर्गम, जंपला जोडे, वनसकुमार दुर्गम, देवेंद्र कुमरी, राजेश माडेम, राजेश आत्राम, व्यंकटी सोदारी, व्यंकटेश बुरा, राजू माडेम, समय्या टेकाम, लक्षमय्या टेकाम, लिंगया सला, टेकाम पोचना, टेकाम राजबापू, टेकाम समया, टेकाम राजना, टेकाम सिनू, टेकाम गोपी, टेकाम मन्या, टेकाम नरसकका, टेकाम सम्मका, टेकाम सपना, टेकाम मारक्का, टेकाम सौंदर्या, कलटम बालाजी, जमपया चौधरी, सत्यम पेंडाला, सुरेश लेंडगुरे, जमपना कादले आदींचा समावेश आहे.

यावेळी रंगयापल्लीचे राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते बुच्चया येंदलया, श्याम पोतनवार, सत्यनारायण किष्टया नागोशे, सिरोंचाचे रवि सुलतान, व्यंकटेश पुजारी, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जुगनू शेख, प्रकाश मुडीमडीगेला, नागभूषणम चकिनारपुवार आदीची उपस्थिती होती.