पेंढरी, गट्टा परिसरातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस प्रवेश

सरपंच, महिला कार्यकर्त्यांचा समावेश

गडचिरोली : धानोरा तालुक्यात पेंढरी, गट्टा व आसपासच्या गावांतील भाजपचे अनेक पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आणि महिलांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. गडचिरोली येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यातील मूलभूत समस्या सुटत नाहीत. अनेक वेळा मागण्या करूनही त्यावर तोडगा निघत नाही. युवकांना रोजगार मिळत नाही, शेतकरी अडचणीत आहेत अशी व्यथा मांडत त्यांनी काँग्रेससोबत येण्याचा निर्णय घेतला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात परमेश्वर गावडे (सरपंच, दुर्गापूर), देवसाय गावडे (सरपंच, कामतडा), कांडेराम उसेंडी (सरपंच, झाडापापडा), माणिक हिचामी (ग्रामसभा अध्यक्ष, सावंगा), लक्ष्मण आतला, उत्तम आतला, अरविंद मडावी, हिरामण गावडे, अरविंद टेकाम, गणेश पोटावी, दिलीप जोरी, हरिदास गावडे, रमेश मडावी, विशाल नरोटे, मधुकर जाडे, देवू नरोटे, विजय गावडे, मोतीराम दरो, अजय पदा, विलास नरोटे, लालू टेकाम, गणेश गावडे, कुमारी हेमलता धुर्वे, पल्लवी गावडे, गीता गावडे, सपना मडावी, योगिता मडावी या प्रमुख कार्यकर्त्यांसह इतर अनेक भाजपचे युवक व महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.कविता मोहरकर, धानोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदुजी वाईलकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.